Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 54 नवीन कोरोना बाधित तर 27 कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

जिल्हयात एकूण कोरोना बाधितांनी 10 हजारचा टप्पा ओलंडला, तरीही राज्यात सर्वात कमी रूग्ण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 18: जिल्हयात आज 54 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10020 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9618 वर पोहचली. तसेच सद्या 294 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.99 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.93 टक्के तर मृत्यू दर 1.08 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 54 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 23, अहेरी तालुक्यातील 7, आरमोरी तालुक्यातील 3, भामरागड तालुक्यातील 1, चामोर्शी तालुक्यातील 5, धानोरा तालुक्यातील 1, कोरची तालुक्यातील 2, तर वडसा तालुक्यातील 12 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 27 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 16, अहेरी 1, आरमोरी 2, चामोर्शी 1, धानोरा 1, कोरची 1, कुरखेडा 1, तर वडसा मधील 4 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये पोलीस हॉस्पीटल 1, शिवाजी नगर ग्रामसेवक कॉलनी 1, नवेगाव 5, स्नेहानगर 1, स्थानिक 1, रामपुरी वार्ड कॅम्प एरिया 1, साईनगर 1, कर्मवीर विद्यालय अर्मिझा जवळ 3, रांगी 1, रामनगर 1, शिवाजी हायस्कुल, पोर्ला जवळ 2, आशा निकेतन चर्च जवळ वसा 2, शिवाजी स्कुलच्या मागे 2, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, नागेपल्ली 4, कनेपल्ली 1, आलापल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये वांखी 1,वैरागड 2, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये सोमनपल्ली 1, आष्टी 1, स्थानिक 1, वायगाव 1, गणेशनगर 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये रामगड 1, मेंढेगाम 1, वडसा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, फॉरेस्ट कॉलनी 3, किदवई वार्ड 1, मोहटोला 1, उसेगाव 2, चप्राड 1, कुरुड 1, भगतसिंग वार्ड 1, चिखली रिथ 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 0 जणांचा समावेश आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.