Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जाणून घेतल्या भामरागड तालुक्यातील समस्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

आदिवासी विद्यार्थी संघाची कार्यकर्ता बैठकीत कार्यकर्त्यांनी मांडल्या समस्या.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली, दि. ०४ नोव्हेंबर: भामरागड तालुक्यात गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालावार दौऱ्यावर असतांना भामरागड तालुक्यात समावेश असणाऱ्या गांवातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी व संघटन मजबूत करण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक भामरागड येतील विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होते. सदर बैठकीत भामरागड तालुक्यातील विविध समस्या कार्यकत्यांनी जि.प.अध्यक्ष यांच्या समोर मांडल्या   त्या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. भामरागड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करण्यासाठी जोमाने कार्य करावे असे सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.