Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुलखल येथील सरपंचाचे सदस्यत्व रद्द : अतिक्रमण भोवले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २५ मार्च: तालुक्यातील पुलखल ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रणित गटाने सत्ता स्थापन केली होती. मात्र सरपंच जयश्री दिपक कन्नाके यांचे पती दिपक कन्नाके यांचे राहते घर हे शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले असल्याने जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी सरपंच जयश्री कन्नाके यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या व ग्रामपंचायत सदस्य सावित्री तुकाराम गेडाम यांनी सरपंच जयश्री कन्नाके यांचे पती दिपक कन्नाके यांचे राहते घर हे शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधकाम करुन राहत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून त्यांना सदस्य पदावरून अनर्ह करावे अशी तक्रार दाखल केली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी याबाबत गडचिरोली तहसीलदार मार्फत संबंधित अतिक्रमणाची शहानिशा करून तसेच सरपंच जयश्री कन्नाके यांना बाजू मांडण्यासाठी संधी देवून सर्वोच्च न्यायालयाने जनाबाई विरुद्ध अपर आयुक्त याप्रकरणाचा दाखल देत ग्रामपंचायत सदस्य पदावर कार्यरत राहण्यासाठी अनर्ह करण्यात येत असल्याचे आदेश २४ मार्च रोजी केला. पुलखल ग्रामपंचायतींमध्ये भाजप प्रणित गटाचे चार तर शेतकरी कामगार पक्ष समर्थीत गटाचे तीन सदस्य निवडून आले होते. आदिवासी महिलेकरीता सरपंच पद राखीव असलेल्या पुलखल ग्रामपंचायतीचे राजकारण या आदेशामुळे ढवळून निघाले आहे.तर दुसरीकडे जिल्ह्यातील अतिक्रमण केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये खळबळ माजली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.