Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तर, रोड रोलर चालवून सायलन्सरची लावली विल्हेवाट

  • फटाके फोडणाऱ्या अनेक बुलेटवर कारवाई.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अकोला, दि. २५ मार्च: बुलेटचा सायलन्सर बदलून फटाक्यांसारखा मोठा आवाज करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक जि. श्रीधर यांनी दिले आहेत. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी अशा अनेक वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तसेच त्यांच्या वाहनांचे सायलन्सर काढण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान, यानंतर हे सायलेन्सर परत न देता ते वरिष्ठांची परवानगी घेत न्यायालयाच्या आदेशाने हे ४५ सायलेन्सर रोडरोलर खाली नष्ट केलेय. या कारवाईमुळे बुलेट चालवून फटाके फोडणाऱ्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. वाहतूक पोलिसांचे प्रमुख गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात ही अनोखी मोहीम सुरु केली आहे.

Comments are closed.