Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बंदुकीचा धाक दाखवून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, 5 जणांना अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

पुण्यातील काही तरुणांनी एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे, 29 मार्च: पुण्यात काही दिवसांपूर्वी एका संशयित युवकाकडे सापडलेल्या बंदुक प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. संबंधित बंदुकीबाबत चौकशी करत असताना पुणे शहर पोलिसांनी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आणलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सामुहिक अत्याचारशी जोडले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी बंदुकीचा धाक दाखवत तीन तरुणांनी एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जप्त केलेल्या बंदुकीबाबत चौकशी करत असताना, दोन आठवड्यापूर्वी संबंधित बंदुकीतून एका अल्पवयीन मुलीवर गोळी चालवण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलीचा शोध घेवून चौकशी केली असता तिने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने गोळी चालवल्याच्या दिवशी तिच्यावर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला होता, अशी माहिती दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.