Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; एम. एस. रेड्डी यांचं अखेर निलंबन

  • वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरत असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांना निलंबन करण्यात आले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. ३० मार्च: वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरत असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांच्या स्पष्टीकरणामुळे नवा वाद निर्माण झाला होता. राज्य शासनाच्या आदेशांनुसार रेड्डी यांची तत्काळ बदली केली गेली नाही, तसेच त्यांनी आपले स्पष्टीकरण क्षेत्र संचालकांचे लेटरहेड वापरून केले, असा आक्षेप घेण्यात आला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याच पार्श्वभूमीवर आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांचं अखेर निलंबन करण्यात आलेले आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता ही निलंबनाची कारवाई झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Comments are closed.