Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संतापजनक! ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. ३० मार्च: अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगिर पोलीस स्टेशन हद्दीत ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची  संतापजनक घटना घडली आहे. किशोर लळके (५५) असे या नराधमाचे नाव आहे. किशोरने चिमुकलीला होळीची गाठी देतो म्हणून वाड्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. मुलगी घरी रडत आल्याने आईने विचारले असता ही आपबिती समोर आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आईच्या फिर्यादीवरून मंगरूळ दस्तगिर पोलिसांनी पोस्को अंतर्गत ३५४ ब, ५०४, ५०६, बाल लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम २०१२ नुसार कलम ८ व कलम १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. किशोर लळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. या संदर्भात अधिक तपास पोलीस करीत आहेत.


टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.