Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेल्वेच्या धडकेने गवारेड्याचा मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.


सिंधुदुर्ग, दिनांक ११ एप्रिल: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मडगांवच्या दिशेने जात असलेल्या सीएसएमटी – मेंगलोर या रेल्वेगाडीची ट्रॅकवर अचानक आलेल्या गवारेड्याला धडक बसली. धडकेत थेट इंजिनाच्या बफरमध्ये घुसलेला गवारेडा जागीच गतप्राण झाला.

ही घटना वैभववाडी ते अचिर्णे यादरम्यान आज सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे रेल्वेगाडी तब्बल दीड तास घटनास्थळी थांबून होती.

दरम्यानच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून गवारेड्याला चक्क कापून बाजूला केले. त्यानंतर गाडी मार्गस्थ झाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.