Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात ८ मृत्यूसह आज ३०५ नवीन कोरोना बाधित तर ७१ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली,दि. १४ एप्रिल: आज जिल्हयात ३०५ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ७१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १३२५७ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १०९२४ वर पोहचली. तसेच सद्या २१६८ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण १६५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज ८ नवीन मृत्यूमध्ये सावरगांव ता. चिमुर जि. चंद्रपूर येथील ६९ वर्षीय पुरुष, तर गडचिरोली तालुक्यातील ४६ वर्षीय महिला, तालुका आरमोरी जि. गडचिरोली येथील ५१ वर्षीय पुरुष, तालुका ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील ६० वर्षीय महिला, तालुका अहेरी जि. गडचिरोली येथील ६१ वर्षीय पुरुष, ता. भामरागड जि. गडचिरोली येथील ५२ वर्षीय पुरुष, नागपूर जिल्ह्यातील ८६ वर्षीय महिला तसेच ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील प्रीटर्म बेबी यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.४० टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १६.३५ टक्के तर मृत्यू दर १.२४ टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन ३०५ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १४९, अहेरी तालुक्यातील ६, आरमोरी २८, भामरागड तालुक्यातील ५, चामोर्शी तालुक्यातील १२, धानोरा तालुक्यातील १०,  एटापल्ली तालुक्यातील १०, कोरची तालुक्यातील १२,  कुरखेडा  तालुक्यातील बाधितामध्ये १९, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये ३, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये ३ तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये ४८ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ७१ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील ४६, अहेरी १, चामोर्शी २, धानोरा १, मुलचेरा १, सिरोंचा १४, कोरची २, कुरखेडा २, तसेच वडसा येथील २ जणाचा समावेश आहे.

Comments are closed.