Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! गडचिरोली जिल्ह्यात १५ मृत्यूसह आज ४६६ नवीन कोरोना बाधित तर २१८ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १७ एप्रिल: आज जिल्हयात ४६६ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज २१८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १४४८५ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ११४६६ वर पोहचली. तसेच सद्या २८१९ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण २०० जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज १५ नवीन मृत्यूमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कढोली येथील ६६ वर्षीय पुरुष, गडचिरोली जिल्ह्यातील गोकुलनगर येथील ४३ वर्षीय महिला, गडचिरोली येथील नवेगाव कॉम्पलेक्स येथील ६३ वर्षीय पुरुष, कुरखेडा तालुक्यातील ३६ वर्षीय पुरुष, चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका नागभिड येथील ५५ वर्षीय पुरुष, जिल्हा भंडारा ता. पवनी येथील ३५ वर्षीय पुरुष , जिल्हा भंडारा ता. लाखांदुर येथील येथील ३५ वर्षीय महिला, ता.कुरखेडा येथील ५३ वर्षीय महिला, जिल्हा गडचिरोली गोकुलनगर येथील ४८ वर्षीय पुरुष, आरमोरी तालुक्यातील ५६ वर्षीय पुरुष, जिल्हा चंद्रपूर ता. ब्रम्हपुरी येथील ५८ वर्षीय पुरुष, आरमोरी तालुक्यातील 60 वर्षीय महिला, गडचिरोली येथील ४८ वर्षीय महिला, गडचिरोली येथीलच ५५ वर्षीय पुरुष तर जिल्हा भंडारा तालुका लाखांदुर येथील ६० वर्षीय महिलेचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.१६ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १९.४६ टक्के तर मृत्यू दर १.३८ टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

                नवीन ४६६ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १९६, अहेरी तालुक्यातील ३३, आरमोरी ३५, भामरागड तालुक्यातील ५,  चामोर्शी तालुक्यातील २४, धानोरा तालुक्यातील ८, एटापल्ली तालुक्यातील २१, कोरची तालुक्यातील ३३, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये ४४, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये १४, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये ११ तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये ४२ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या २१८ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील ८१, अहेरी २३,  आरमोरी ११, भामरागड ३०, चामोर्शी ६, धानोरा १३, एटापल्ली १३, सिरोंचा १२, कोरची ९, कुरखेडा ३, तसेच वडसा १७ येथील जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.