Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिह्ल्याला मिळणार २०० ऑक्सिजन सिलेंडर

– आकाश अग्रवाल व कैलास अग्रवाल यांच्या कडून पुढाकार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

देसाईगंज, दि. २५ एप्रिल: येथील प्रसिध्द उद्योग पती तथा युवा समाजसेवक आकाश अग्रवाल व उद्योगपती कैलास अग्रवाल यांनी गडचिरोली जिह्ल्यातील रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता पाहून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन गडचिरोली यांना २०० खाली सिलेंडर जिल्हा शल्यचिकित्सक यांना मागवून ते भरून आणून देण्याकरिता पुढाकार घेतला. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हात होत असलेली ऑक्सिजनची कमी भरून काढण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही अग्रवाल बंधूंचे जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने त्यांच्या समाजकारणाचे कौतुक केल्या जात असून त्यांच्या प्रमाणेच इतरांनी सुध्दा आरोग्य सेवेत आपले योगदान दिल्यास जिल्हात होत असलेली कमी पूर्ण करण्यास मदत होईल. विशेष म्हणजे २०० भरलेले सिलेंडर नागपुर वरून निघाले असून आज रात्रौला गडचिरोली येथे पोहचणार आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.