Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिरम इन्स्टिट्यूट पुणे येथे निषेध आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क, दि. २७ एप्रिल: सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांनी नुकतीच कोविशिल्ड या लसीची निर्मिती केली, ही अभिनंदनाची बाब आहे. या कोविशिल्डची किंमत केंद्र सरकारला १५० रुपये राज्य सरकारांना ४०० रुपये व खाजगी हॉस्पिटल साठी ६०० रुपये आदर पूनावाला यांनी नुकत्याच किंमती जाहीर केले आहे. त्याबाबतीत निषेध मोर्चा भीम आर्मी एकता मिशन महाराष्ट्र यांच्या वतीने आज सिरम इन्स्टिट्यूटच्या गेटवर आंदोलन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सिरम इन्स्टिट्यूटच्या निषेधार्थ यावेळी घोषणा देण्यात आल्या. भीम आर्मी बहुजन एकता मिशन यांच्या कार्यकर्त्यांनी गेटवर निषेध आंदोलन केले. त्याचे नेतृत्व भीम आर्मी मिशनचे अध्यक्ष दत्ता पोळ यांनी केले. यावेळी नीता अडसूळ, अक्षदा परदेशी व प्रदीप कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.