Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात आज २२ मृत्यूसह १०९२ कोरोनामुक्त तर ११७० पॉझिटिव्ह

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • आतापर्यंत 47,217 जणांची कोरोनावर मात
  • ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,823

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 4 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1092 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1170  कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 22 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 65 हजार 38 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 47 हजार 217 झाली आहे. सध्या 16 हजार 823  बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 91 हजार 838 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 21 हजार 634 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज चौक परिसरातील 48 वर्षीय पुरुष, पठाणपुरा परिसरातील 50 वर्षीय पुरुष, गांधी चौक येथील 85 वर्षीय महिला, विठ्ठल मंदिर वार्ड परिसरातील 72 वर्षीय पुरुष, 47,50 व 62 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वरोरा तालुक्यातील अभ्यंकर वार्ड परिसरातील 55 वर्षीय पुरुष.50 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील गुरु नगर येथील 54 वर्षीय महिला. कोरपना तालुक्यातील 66 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली येथील 42 वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील तळोधी येथील 35 वर्षीय पुरुष, धामणगाव येथील 65 वर्षीय महिला. ब्रह्मपुरी तालुक्यातील नवरगाव येथील 37 वर्षीय पुरुष. सिंदेवाही तालुक्यातील 43 वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील कोलारी येथील 50 वर्षीय महिला, पाचगाव येथील 55 वर्षीय महिला, वडाला पैकु येथील 53 वर्षीय पुरुष, तर राजुरा तालुक्यातील रामपूर येथील 77 वर्षीय पुरुष. वणी-नायगाव येथील 26 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 998 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 925, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 29, यवतमाळ 29, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.