Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तथा शिवजन्मोत्सव समिती अहेरी द्वारा आयोजित भव्य रक्तदान शिबिरात २१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. ४ मे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अहेरी नगर तथा शिवजन्मोत्सव समिती अहेरी द्वारा आज अहेरी येथिल डॉ. हेडगेवार सेवा समिती कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात शिवजन्मोत्सव समितीच्या सदस्यासह २१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप बघता ठीकठिकाणी रुगणांनारक्त व प्लाझ्मा ची गरज भासत आहे.त्यामुळे सध्याच्या कठीण काळात युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून रक्ताची निकड पूर्ण करून राष्ट्रसेवेत हातभार लावावा असे आवाहन  राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात येत आहे.

यावेळी रक्तदान शिबिरात अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी विभागाचे वाघ,निखिल कोंडपर्टी यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी रक्तदान शिबिराला जिल्हा सहसंघचालक गजानन राऊलवार यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल उंचावले.रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी क्षितिज कविराजवार सह, संतोष मद्दिवार, नीरज गुरनुले, ओमकार कोडगिरवारं, मोनू पारेलिवार, जीवन नवले, सूचित कोडेलवार, आदेश मंचालवार, रक्षित नरहरशेट्टीवार, रितिक कुंभारे, गणेश येलमुले, अभिषेक कविराजवार, आदींनी विशेष परिश्रम घेतले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.