Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आय. सी. आय. सी. आय. बँकेकडून गडचिरोली जिल्हयासाठी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ११ मे : रुग्णसेवेच्या दृष्टीने आयसीआयसीआय बँकेने आपल्या सीएसआर फंडातून गडचिरोली आरोग्य विभागासाठी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हाधिकारी दीपक सिंगलस यांचेकडे भेट दिले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष गुप्ता, आयसीआयसीआय बँकेचे विभागीय प्रमुख विवेक बल्की, गडचिरोली शाखेचे व्यवस्थापक प्रविण विपट, शासकिय रीलेशनशीप मॅनेजर आशिष खोब्रागडे उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सद्या झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना संसर्गासोबत ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. ज्यामुळे, ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा काही प्रमाणात भासतोय. ही उणीव भरून काढण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन गडचिरोली साठी भेट देण्यात आली. प्रशासनाकडून जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बँकेचे विभागीय प्रमुख विवेक बल्की व आयसीआयसीआय बँकेचे आभार मानले.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अखेर सकारात्मक विचारांनी तीन आठवडे कोरोनाशी झुंज देऊन ‘ती’ परतली सुखरूप घरी

Petrol Diesel Price : पेट्रोल 26 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी वाढलं

Comments are closed.