Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 11 मृत्यूसह 243 नवीन कोरोना बाधित तर 158 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 19 मे : आज जिल्हयात 243 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 158 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 27978 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 25023 वर पोहचली. तसेच सद्या 2306 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 649 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 11 नवीन मृत्यूमध्ये  55 वर्षीय महिला नवेगाव ,गडचिरोली,  64 वर्षीय पुरुष आरमोरी, 57 वर्षीय पुरुष डेलोडा ता.आरमोरी, 55 वर्षीय पुरुष  आष्टी ता.चामोर्शी, 58 वर्षीय पुरुष चालेवाडा ता. अहेरी, 50 वर्षीय पुरुष आरमोरी, 70 वर्षीय पुरुष खेडेगांव ता. कुरखेडा, 72 वर्षीय पुरुष आरमोरी, 53 वर्षीय पुरुष जीबगाव ता. सावली जि. चंद्रपूर,79 वर्षीय पुरुष नवेगाव,गडचिरोली, 1 नवजात शिशु वाको ,ता. कोरची जि. गडचिरोली, यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.44 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 8.24 टक्के तर मृत्यू दर 2.32 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Corona Gadchiroli

नवीन 243 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 60, अहेरी तालुक्यातील 21, आरमोरी 20, भामरागड तालुक्यातील 07, चामोर्शी तालुक्यातील 29, धानोरा तालुक्यातील 04, एटापल्ली तालुक्यातील 17, कोरची तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 06, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 31, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 26 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 20 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 158 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 101, अहेरी 07,  आरमोरी 04, भामरागड 00, चामोर्शी 20, धानोरा 05, एटापल्ली 00, मुलचेरा 07, सिरोंचा 04, कोरची 02, कुरखेडा 03 तसेच वडसा येथील 05 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : 

अरबी समुद्रात ‘बार्ज P- 305’ वरील रेस्क्यू ऑपरेशन थरार सुरूच

तोक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन तात्काळ मदत करा – मंत्री विजय वडेट्टीवार

 

Comments are closed.