Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवनाथ कुंभारे, डॉ. मारोती रायपुरे, जनसंसदेचे जिल्हा अध्यक्ष विजय खरवडे यांचे लोकस्पर्श न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

आलापल्ली, दि. ०७ नोव्हेंबर: गडचिरोली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवनाथ कुंभारे, डॉ. मारोती रायपुरे, नरेंद्र वासेकर, भारतीय जनसंसदेचे जिल्हा अध्यक्ष विजय खरवडे यांनी आज संध्याकाळच्या सुमारास लोकस्पर्श न्यूजच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन लोकस्पर्श न्यूजच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.   

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवनाथ कुंभारे, डॉ. मारोती रायपुरे व नरेंद्र वासेकर या समवेत आलापल्लीच्या दौऱ्यावर असतांना भारतीय जन संसदेचे जिल्हा अध्यक्ष विजय खरवडे यांनी माध्यम क्षेत्रात नव्यानेच पदार्पण केलेल्या लोकस्पर्श न्यूजच्या कार्याबद्दल माहिती दिली. त्यामुळे डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी विजय खरवडे यांना लोकस्पर्श न्यूज च्या कार्यालयाला भेट देण्याची ईच्छा व्यक्त केली. आपले व्यस्त कार्यक्रमात वेळ काढून त्यांनी आज संध्याकाळच्या सुमारास लोकस्पर्श कार्यालयाला भेट देऊन संपादक मंडळाशी दारूबंदी, विविध सम सामाईक विषयावर अनौपचारिक चर्चा केली. यावेळी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे स्वागत लोकस्पर्श न्यूज चे मुख्य संपादक ओमप्रकाश चुनारकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. डॉ. मारोती रायपुरे यांचे स्वागत कार्यकारी संपादक रवी मंडावार यांनी केले, नरेंद्र वासेकर यांचे कार्यकारी संपादक स्वागत मिलिंद खोंड यांनी केले तर विजय खरवडे यांचे स्वागत उपसंपादक सचिन कांबळे यांनी केले. सामाजिक कार्यात अनेक वर्ष कार्य करणारे डॉ. शिवनाथ कुंभारे, डॉ. मारोती रायपुरे यांनी लोकस्पर्श  न्यूजचे कार्य जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक विधायक मंच ठरावे असे मनोगत व्यक्त केले.   

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.