Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते इंदाराम येथे तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन

  • टाटा टाटार्सं कंपनीच्या माध्यमातून निधी उपलब्ध.
  • परिसरातील शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली  : अहेरी तालुक्यातील इंदाराम येथे मामा तलाव असुन गेल्या अनेक वर्षापासून खोलीकरण करण्यात आले नव्हते. सदर कामांसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पाठपुरावा करून टाटा कंपनी विभागाकडून निधी मंजूर करण्यात आले. सदर कामाचे भूमिपूजन जि. प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

इंदाराम येथील तलाव मागील अनेक वर्षांपासून खोलीकरण केले नसल्याने या परिसरातील गावातील शेतकऱ्यांना बिनउपयोगी ठरत होते. जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याने इंदाराम येथील सर्व गावकरी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

तलाव खोलीकरण झाल्यास पाण्याची साठवणूक जास्त होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल म्हणून, पूरकपणे पीक घेण्यास सोईचे होईल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी ग्रा पं इंदारामचे सरपंचा वर्षाताई पेंदाम, उपसरपंच वैभव कंकडालवार, माजी सरपंच गुलाबराव सोयाम, सुर्यप्रकाश पेंदाम, तुलसीराम कांबळे, बबीता रमेश आत्राम, ग्रा.पं. सदस्य कविता सोयाम, मुसली आत्राम, जयराम आत्राम साई पेंदाम, प्रल्हाद पेंदाम, चित्रा सिडाम, रोशन सामलवार, राकेश सडमेक, लक्ष्मण आत्राम तसेच गावातील नागरिक, शेतकरी बांधव यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा : 

गडचिरोली जिल्ह्यातील दुकानांची वेळ वाढवून द्या: शिवसेना अहेरी तालुका अध्यक्ष सुभाष घुटे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

ऑनलाईन कविसंमेलनातून कोरोना लसिकरणाचा संदेश

 

Comments are closed.