Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज दोन अंकी संख्येत कोरोनाबाधितांची नोंद

गडचिरोली जिल्ह्यात आज 53 नवीन कोरोनाबाधित तर 265 कोरोनामुक्त, 7 जणांचा मृत्यू 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 24 मे : आज जिल्हयात 53 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 265 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28763 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 26452 वर पोहचली. तसेच सद्या 1614 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 697 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज 7 नवीन मृत्यूमध्ये 48 वर्षीय पुरुष महागांव ता.अहेरी, 44 वर्षीय पुरुष ता.वडसा , 45 वर्षीय पुरुष टेकडा ता.सिरोंचा, 21 वर्षीय पुरुष ता.सिरोंचा, 60 वर्षीय पुरुष ता.अहेरी, 50 वर्षीय पुरुष ता.अहेरी, 75 वर्षीय पुरुष गणेश काँलोनी गडचिरोली याचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.97 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 5.61 टक्के तर मृत्यू दर 2.42 टक्के झाला.

नवीन 53 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 27, अहेरी तालुक्यातील 5, आरमोरी 4, भामरागड तालुक्यातील 0, चामोर्शी तालुक्यातील 8, धानोरा तालुक्यातील 2, एटापल्ली तालुक्यातील 0, कोरची तालुक्यातील 4, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 1 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 1 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 265 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 73, अहेरी 29, आरमोरी 2, भामरागड 04, चामोर्शी 63, धानोरा 6, एटापल्ली 14, मुलचेरा 13, सिरोंचा 14, कोरची 11, कुरखेडा 6 तसेच वडसा येथील 30 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा :

दिलासादायक! भारतात लहान मुलांवरील ‘या’ महिन्यापासून कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायलला सुरुवात

कोरोनाचा उगम चीन देशातल्या वुहानच्या प्रयोग शाळेतूनच

बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी गजाआड

 

Comments are closed.