Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर मधील नाभिक समाज व ऑटो चालकांना किराणा किटचे वाटप

माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर व खा. अशोक नेते यांच्या हस्ते १०० किटचे वाटप.

Get real time updates directly on you device, subscribe now.

चिमूर : केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर येथे चिमूर विधानसभा चे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्फत गरीब व गरजू नागरिक, नाभीक समाज, ऑटो चालक संघटना, इतर गरजू व कोरोना महामारीच्या संकटात सापडलेल्या सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या (किराणा) किटचे वाटप करण्यासाठी दि. २७ मे रोजी अभ्यंकर मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहिर, खा. अशोक नेते, आ. बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी मंचावर भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत वारजूरकर, प्रदेश सदस्य डॉ. श्याम हटवादे, जिल्हा उपाध्यक्ष राजू देवतळे, ज्येष्ठ नेते निलमज राचलवार, तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, सावली चे तालुका अध्यक्ष अविनाश पाल, महिला आघाडीच्या अध्यक्षा मायाताई नन्नावरे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी अभ्यंकर मैदानावर १०० मजूर, गरजू नागरिक, नाभिक समाज बांधव तसेच ऑटो रिक्षा चालक यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

हे देखील वाचा : 

मोठी बातमी: दहावीचा निकाल जूनच्या अखेरीस, विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे होणार मूल्यमापन – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

पाकिस्तान मध्ये बनतोय विचित्र कायदा; १८ वर्षावरील तरुण तरुणीचे लग्न न झाल्यास पालकांना दंड

मॅजिक बस संस्थेचा अभिनव उपक्रम; “शाळा बंद शिक्षण सुरू”

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.