Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सावली तालुक्यात 150 गरजूंना खा. अशोक नेते यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सावली, दि. 28 मे : भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक तथा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री, भाजपा ज्येष्ठ नेते  ना. नितीन गडकरी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सावली तालुक्यातील सलून व्यवसायिक आणि ऑटो चालक संघटना यांना भांगडीया फाऊंडेशन तर्फे भाजपा ज्येष्ठ नेते खा. अशोक नेते व भाजपचे प्रदेश सदस्य वसंतभाऊ वारजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्राम गृह सावली येथे 150 किराणा किटचे वाटप करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रसंगी प्रामुख्याने सर्वश्री तालुका अध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, सावली शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर, भाजयुमो शहर अध्यक्ष राहुल लोडेल्लीवार, अल्पसंख्यांक आघाडीचे साजिद शेख, युवा नेते गौरव संतोषवार, राकेश विरमलवार, मयुर व्यास, हरिष जक्कुलवार व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच पाथरी येथेही ग्राम पंचायत कार्यालयासमोर खासदार अशोकजी नेते, प्रदेश सदस्य वसंतराव वारजूरकर, तालुका अध्यक्ष अविनाश पाल, पं स सदस्य तुकाराम पाटील ठिकरे यांच्या हस्ते 32 सलून व्यावसायिक व ऑटो रिक्षा चालकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुका महामंत्री दिलीपजी ठिकरे, पाथरीचे सरपंच ठिकरे, उपसरपंच प्रफुल्ल तुम्मे, शरद सोनवाणे, सतीश मुत्तेलवार, अरुण सूर्यवंशी, गणेश मुत्तेलवार, प्रसाद मेश्राम, लतीश मुत्तेलवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर मधील नाभिक समाज व ऑटो चालकांना किराणा किटचे वाटप

मोठी बातमी: दहावीचा निकाल जूनच्या अखेरीस, विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे होणार मूल्यमापन – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.