Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज ५५३ कोरोनामुक्त,२९८ कोरोना बाधित तर २ जणांचा मृत्यू

आतापर्यंत 78,186 जणांची कोरोनावर मात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि.30 मे : जिल्ह्यात कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत नियामितपणे वाढ होत असून जिल्ह्यसाठी ही दिलासादायक बाब आहे. गत 24 तासात 553 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 298 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 255 ने जास्त आहे. तसेच जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आज (दि. 30) बाधीत आलेल्या 298 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 71 रुग्ण, चंद्रपूर तालुका 26, बल्लारपूर 54, भद्रावती 24, ब्रम्हपुरी 8, नागभिड 02, सिंदेवाही 06, मूल 05, सावली 04, पोंभूर्णा 09, गोंडपिपरी 05, राजूरा 27, चिमूर 02, वरोरा 22, कोरपना 29, जिवती 01 व इतर ठिकाणच्या 03 रुग्णांचा समावेश आहे. तसेच आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील बगड खिडकी परिसरातील 74 वर्षीय पुरुष तर 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 82 हजार 605 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 78 हजार 186 झाली आहे. सध्या 2 हजार 978 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 70 हजार 446 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 85 हजार 187 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 1441 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1336, तेलंगणा राज्यातील दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 38, यवतमाळ 48, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रशासनाचे आवाहन : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला किंवा कोरोना पूर्णपणे संपला, या मानसिकतेतून नागरिकांनी बाहेर यावे. कोरोनाची मानवी साखळी तोडण्यासाठी दैनंदिन मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे, या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा. तसेच स्वत:ची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.