Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कृषी सहाय्यकानी गळफास लावून केली आत्महत्या!

कट्टा येथील घटना; आत्महत्येचे कारण अस्पष्ट...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिंधुदूर्ग : मालवण तालुक्यातील गोळवण येथे कृषी सहाय्यक म्हणून काम पाहणारे विशाल गंगाधर हंगे (वय-२७) रा. लोणार- बुलढाणा यांनी आज सकाळी भाड्याच्या खोलीत दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबतची माहिती विजय कांबळे यांनी पोलिसांत दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मालवण तालुका कृषी विभागात कार्यरत असलेले विशाल हंगे हे गोळवण येथे कृषी सहायक म्हणून कर्तव्य बजावत होते. ते कट्टा येथे कृषी सहायक विजय कांबळे यांच्यासोबत भाड्याने राहत होते. काल सायंकाळी ते काम आटोपून भाड्याने राहत असलेल्या ठिकाणी आले. सहकारी मित्र विजय कांबळे यांनी रात्रीचे जेवण करून त्यांना जेवणासाठी बोलाविले. मात्र त्यांनी तुम्ही जेवून घ्या मी नंतर जेवतो असे सांगून खोलीत आपले काम सुरू ठेवले.

आज सकाळी कांबळे यांना विशाल हंगे हे आपल्या खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ याची माहिती कट्टा येथील पोलिस विभागाला दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांनीही घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.