Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्पुतनिक लसीच्या साठा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होणार : राजेश टोपे

स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा झाली असून येत्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई  डेस्क: “राज्यात सध्या १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करायचं आहे. मात्र सध्या लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा झाली आहे. येत्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोना लसीकरण मोहिम सुरु आहे. मात्र सध्या कोरोना लसींचा तुटवडा भासत आहे. याच पार्श्वभूमीवर स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी ही चर्चा पूर्ण झाली आहे. त्यानुसार येत्या जुलै किंवा ऑगस्टमध्ये स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे

केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून व्हॅक्सीन इंपोर्टचं एक स्पष्ट धोरण ठरवावं. तसेच याला इतर राज्यांना मदत करावी. तसेच ज्यांनी दोन लस घेतल्या असतील तरी मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. सध्या तरी तोंडावरचा मास्क हटणार नाही, असेही राजेश टोपे म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसेच दोन्ही लसी घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अँटिबॉडीज तयार होत असतात. त्याशिवाय जर तुम्ही अँटीबॉडीज चेक केल्या असतील आणि शरीरात जर भरपूर अँटीबॉडीज असतील तर त्या व्यक्तीला कुठलाही काही प्रॉब्लेम नसतो. पण शास्त्रीय पद्धतीने लस घेणाऱ्या व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होत नसला तरी मास्क आणि सोशल डिस्टंसिंग राखणे ही महत्त्वाची गरज आहे, असेही राजेश टोपेंनी सांगितले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.