Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात आज 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 जणाचा मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर,दि. 8 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 118 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 106 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 1 बाधिताचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

बाधित आलेल्या 106 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 28, चंद्रपूर तालुका 5, बल्लारपूर 21, भद्रावती 4, ब्रम्हपुरी 1 , नागभिड 3, सिंदेवाही 2, मूल 9, सावली 0, पोंभूर्णा 5, गोंडपिपरी 7, राजूरा 7, चिमूर 1, वरोरा 2, कोरपना 11, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये वरोरा तालुक्यातील पाझूंर्णी येथील 46 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 83 हजार 755 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 80 हजार 822 झाली आहे. सध्या 1 हजार 447 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 99 हजार 180 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 12 हजार 537 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1486 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1376, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 39, यवतमाळ 51, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याने अटक

नदीच्या पात्रात पडलेल्या कुटुंबाला वाचवणाऱ्याचाच नदीत बुडून मृत्यू

दिलासादायक ! नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.