Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जळगावची २० मेट्रिक टन केळी पोहोचली सातासमुद्रापार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

जळगाव : जिल्ह्यातील तांदलवाडी येथून २० मेट्रिक टन केळीचा एक कंटेनर नुकताच दुबईला रवाना झाला. यानिमित्ताने जळगावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे आपली पावले टाकली आहेत.

रावेर तालुक्यातील तांदलवाडी  सुमारे ५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील बहुसंख्य शेतकरी केळीचे उत्पादन घेतात. येथील केळी उत्पादक शेतकरी वर्षाकाठी ३५० कंटेनर म्हणजेच सुमारे ७ ते साडेसात हजार मेट्रिक टन निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उत्पादित होणाऱ्या केळीपैकी काही माल हा देशांतर्गत स्थानिक बाजारपेठेत तर काही माल हा परदेशात निर्यात होत असतो. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याच गावातील प्रगतशील शेतकरी प्रशांत महाजन यांनी पहिल्यांदा जीआय मानांकित केळीची परदेशात निर्यात केली आहे. आतापर्यंत या गावातील केळीची परदेशात निर्यात होत होती. मात्र, जीआय मानांकन या टॅगखाली पहिल्यांदा केळीची निर्यात झाली असून, शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे.

ॲग्रीकल्चर अँड प्रोसेसस्ड फूड प्रोडक्टस एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट ॲथॉरिटी म्हणजेच ‘अपेडा’ने पुढाकार घेतला. यामुळे जीआय मानांकित केळी दुबईला पाठवता आली. अपेडाने मध्यस्थी करत गुजरातमधील नवसारी येथील देसाई ॲग्री फूड्स नावाच्या कंपनीशी संवाद साधून दिला. त्यातून २० मेट्रिक टन जीआय मानांकित केळी ट्रकने  मुंबईला व तेथून जेएनपीटी बंदरावरून थेट दुबईला निर्यात करता आली, केळी उत्पादक शेतकरी सांगतात.

हे देखील वाचा  :

मयूर फरताडेने शोधून काढला फेसबुक इन्स्टग्रामवरचा बग

चार दिवसाच्या चिमुकलीची वैरीण झाली माता, कॅरीबॅगमध्ये बेवारस सोडून केले स्वतःचे पलायन!

Exclusive Story : शववाहिका चालक म्हणून काम करते ‘हि’ जिगरबाज मुलगी

Comments are closed.