Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज मृत्यूची नोंद नाही तर 26 कोरोनामुक्त,10 नवीन कोरोना बाधितांची नोंद

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. 26 जून : आज जिल्हयात 10 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 26 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30194 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29264 वर पोहचली.

तसेच सद्या 190 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 740 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.92 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.63 टक्के तर मृत्यू दर 2.45 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 10 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 02, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 04, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 02, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 00, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 00 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 01 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 26 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 06, अहेरी 05, आरमोरी 01, भामरागड 00, चामोर्शी 06, धानोरा 02, एटापल्ली 01, मुलचेरा 04, सिरोंचा 01, कोरची 00, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा  :

भाजपा तर्फे अहेरी येथे ओबीसी राजकीय आरक्षणासाठी चक्काजाम व जेलभरो आंदोलन

मुलुंड टोल नाक्यावर आ. अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन  

झनकारगोंदी फाट्यावर भाजपचे ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.