Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालकमंत्र्यांच्या हस्ते लसीकरण जनजागृती मोहिमेच्या चित्ररथाला हिरवी झेंडी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर दि. 10 जुलै: कोरोनावर प्रभावी उपाय म्हणुन लसीकरणावर भर दिला जात आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरीकांचे कोविड-19 लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करून जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी जिल्ह्यामध्ये लसीकरण जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेची सुरुवात 7 जुलै रोजी करण्यात आली असून आज (दि.10) सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवत शुभारंभ केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नागरिकांनी लसीकरणाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. या जनजागृती मोहिमेदरम्यान चित्ररथ, पोस्टर्स, स्टीकरशीट, जिंगल्स, हँडबील आदींच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

यावेळी, सावली पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, सरपंच सुनिता उरकुडे, उपसरपंच भावना विखे, मनीषा जवादे, राकेश गड्डमवार, राजू सिद्धम, दिनेश चिटनूरवार, संदीप गड्डमवार प्रामुख्याने उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोनाबाधित मृत्युचा आकडा शुन्यावर, 26 कोरोनामुक्त तर 20 जण पॉझिटिव्ह

जगातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसचं आक्रमण! कोरोनाचं आव्हान संपलेलं नसल्याचा WHO ने दिला इशारा

BSNL ने लॉन्च केले 3 स्वस्त आणि मस्त प्रीपेड प्लान्स…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.