Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठ व माखनलाल चतुर्वेदी विश्वविद्यालय भोपाळ यांच्यात सामंजस्य करार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाची महाराष्ट्र शासनाद्वारे गडचिरोली येथे २०११ मध्ये स्थापना करण्यात आलेली होती व त्याअनुषंगाने दशमानोत्सवचे औचित्य साधून राष्ट्रीय स्तरावर मानांकन प्राप्त करण्याहेतू पायाभरणी केली.

गोंडवाना विद्यापीठाने १४ जुलै २०२१ रोजी पत्रकारिता व जनसंवाद क्षेत्रा अंतर्गत संशोधन, अभ्सासक्रम निर्मीती, शिक्षक व विद्याथी विकास, पायाभूत सुविधा सचना, शिक्षक व विद्यार्थी देवाण घेवाण, एकत्रीत सहयोग इत्यादी बाबतीत माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता व जनसंवाद विश्वविद्यालय, भोपाळ यांचे समवेत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर विश्वविद्याल याचे कुलगुरू, प्रा. के. जी. सुरेश व गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू, प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही विद्यापीठांच्या कुलसचिवांनी स्वाक्षरी केली.

प्रा. के. जी. सुरेश यांचेनुसार माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता व जनसंवाद विश्वविद्यालय, भोपाळ हे आशिया खंडातील पहिले व सगळ्यात मोठे पत्रकारितेचे विशेष विद्यापीठ असून इंडिया टूडे २०२० मानांकनानुसार देशांतर्गत १२ वें स्थान प्राप्त आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पत्रकारिता व जनसंवाद व्यतिरीक्त गंथालयशास्त्र, व्यवस्थापन असे बहू विद्याशाखीय व नाविन्यपुर्ण अभ्यासक्रम राबविले जातात. गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्राची गरज व उद्दिष्ट प्रतिपुर्तीचा भाग म्हणून ग्रामिण पत्रकारिता केंद्रीत विविधांगी उपकम राबविले जाणार जेणेकरून स्थानिक आदिवासी समुदायास राष्ट्र निर्मीती प्रवाहात सक्रियपणे सामील करता येईल.

याप्रसंगी प्रा. श्रीनिवास वरखेडी यांनी साधुभाव व्यक्त केला की, गोंडवाना विद्यापीठ हे एक वर्तमान उच्च शिक्षण संस्था असून परिक्षेत्राची एक संस्कृती, प्राकृती करमणीयता व स्वभाव आहे. अशा परिस्थीतीमध्ये प्रगती शीतबदल घडवून आणण्याकरिता राष्ट्रीय स्तरावरिल अनुभवी संस्थां सोबत साहचर्य करणे ही एक गरज आहे.

आजच्या घडीचे सामाजीक माध्यमे ही शिक्षणाची माध्यमे झालेली असून अध्ययन क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी अशाप्रकारच्या सामंजस्याची आवश्यकता आहे. सदर करारा सफलश्रूत करण्यास मंगेश इंदापवार, नागपूर यांनी विशेष योगदान दिले.

सदर कार्यक्रमात डॉ. अविनाश वाजपेयी, कुलसचिव, डॉ. पी. शशीकला,  अधिष्ठाता व डॉ. आशिष जोशी, संचालक, माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता व जनसंवाद विश्वविद्यालय, भोपाळ तसेच गोंडवाना विद्यापीठा तर्फे डॉ. श्रीराम कावळे, प्र-कुलगुरू, डॉ. अनिल चिताडे, कुलसचिव व प्रा. मनिष उत्तरवार, संचालक, न. न. व सा. यांची उपस्थिती लाभलेली होती.

हे देखील वाचा :

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?

विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.