Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खा. अशोक नेते यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि १६ जुलै : बँक ऑफ इंडिया गडचिरोली शाखेच्या वतीने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात खा. अशोक नेते यांच्या हस्ते गरजू शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपचे आदिवासी जनजाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, जि.प.च्या समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडाप, महिला आघाडीच्या पल्लवीताई बारापात्रे, लीड बँकेचे व्यवस्थापक टेंभुरणे, बॅंक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक  व बँकेचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी गडचिरोली तालुक्यातील १५ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना खा. अशोक नेते म्हणाले, शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन त्याचे योग्य नियोजन करावे व शेतीसाठी पैसे उपयोगात आणावे व कर्जाची परतफेड वेळीच करावी. तसेच चांगली आधुनिक शेती करून आपल्या उत्पन्नात वाढ करावी व आपला आर्थिक स्तर उंचवावा असे खा. अशोक नेते यांनी सांगितले.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नागेपल्ली येथील पोलीस कर्मचारी हत्याप्रकरण: पत्नी व मुलीनेच रचला हत्येचा कट, सुपारी देऊन केली हत्या

लोकस्पर्शचा दणका : अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी एच. एस. राठोड निलंबित

महाराष्ट्र शासनात 2 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त – अनिल गलगली

 

Comments are closed.