Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जन्म देणाऱ्या “त्या” वयोवृद्ध आई-वडिलांना मारहान करुन काढले घराबाहेर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलडाणा, दि. २९ जुलै : ‘ज्यांनी जन्म दिला, खस्ता खाऊन लहानाचे मोठे केले व लग्नकार्य करून संसार थाटून दिले, त्या आई-वडिलांचा वृद्धापकाळी मायेने सांभाळ करण्याऐवजी मानसिक छळ करून त्यांच जीण हराम करणाऱ्या बुलडाण्याच्या देऊळगाव माळी येथील एका मोठ्या मुलाने मारहाण करून  घराबाहेर काढले आहे. या घडलेल्या घटनेसंदर्भात वृद्ध दांपत्याने बुलडाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तक्रारींचे निवेदन दिले आहे.

बुलडाणा जिल्ह्याच्या देऊळगाव माळी येथील परसराम फलके यांनी आज बुलडाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांचा मोठा मुलगा मारहान करतो मानसिक त्रास देतो, आम्हाला तुमच काही घेन नाही, आम्हाला मारहान करुन घराबाहेर काढले अशी लेखी स्वरूपात तक्रार केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विशेष म्हणजे विनोद फलके हा गावातील माझी उपसरपंच आहे, त्याने त्यांची नावे असलेली घराची जागा ही स्व:तच्या नावे करुन घेतली व बँकेतही काही कल्पना न देता कर्ज काढल्याचा आरोप वृद्ध फलके दाम्पत्याने केला आहे. यापूर्वी त्यानी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना भेटुन घटने संदर्भात तक्रार केली होती. मात्र कुठलीच कारवाही न झाल्याने शेवटी त्यांनी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे. आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वाघ-मानव संघर्षाचा आलेख वाढतच आहे चंद्रपूरात

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पावसात खेळणा-या वाघ बछड्यांचे व्हिडिओ वायरल

कोलामार्का आरक्षित वनक्षेत्रातील वृक्षतोडीची होणार चौकशी; उपवनसंरक्षकांनी दिले आदेश

…या परिचारिकेने गमंत म्हणून काढला व्हीडीओ अन् हा व्हीडीओ समाज माध्यमावर झाला व्हायरल!

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.