Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा लाभ घ्यावा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर दि. 13 सप्टेंबर : केंद्र शासनाने सन 2020-21 या वर्षापासून “पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी” या नवीन केंद्रीय योजनेस मंजूरी प्रदान केली आहे.

सदर योजनेंतर्गत दूध प्रक्रिया (आईस्क्रिम, चीज निर्मिती, दूध पाश्चराईजेशन, दूध पावडर, इत्यादी), मांस निर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना 10 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, व्याज दरामध्ये तीन टक्के सूट देण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या योजनेसंबंधीच्या सर्व मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या http://dahd.nic.in/ahdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या http://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली आहे.

या योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

केंद्र शासनाने नमूद उद्योग व्यवसायासोबतच लिंग विनिश्चित वीर्यमात्रा निर्मिती, बाह्य फलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन याबाबींचा समावेश करण्यात आला आहे.

सदर योजनेचा व्यक्तीगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी यांना लाभ घेता येईल. तरी ईच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूरचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मं.पु. काळे यांनी केले आहे.

हे देखील वाचा :

25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

राज्यात १५ ऑक्टोबरपासून उसाचा गाळप हंगाम सुरु

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.