Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण : अखेर डॉ. नीरज कदमला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वर्धा, दि. १६ जानेवारी : वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे ९ जानेवारी रोजी लैंगिक अत्याचारासह गर्भपात प्रकरणात दाखल गुन्ह्याचा तपासात गर्भपाताचे रहस्य उलगडून काढले. याप्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आई व वडिलांसह गर्भपात करणारी डॉ. रेखा कदम आणि २ परिचारिका अशा ५ जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र, या प्रकरणात मध्यरात्री डॉ. नीरज कदम याला पोलिसांनी मध्यरात्री अटक केल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

डॉ. नीरज कदम  यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना वर्धा जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी त्यांची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शनिवारी कदम यांच्या रुग्णालयासह घरात जिल्हा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी या पथकाला मोठ्या प्रमाणात शासकीय औषधांचा साठा सापडलाय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्राप्त माहितीनुसार, आरोग्य विभाग आणि पोलीस पथकाला रुग्णालयाच्या तपासणीदरम्यान मालाईन ड्रगचे २३ खोके, त्यात औषधीचे एकूण २ हजार ५६३ पॅकेट, असे एकूण ७१ हजार ७६४ गोळ्या आढळळ्या आहेत. तर ऑक्सिटिन नामक ९० इंजेक्शन सुद्धा जप्त करण्यात आले आहे. ही सर्व औषधी शासकीय रुग्णालयातील असल्याची माहिती आहे. महत्वाची बाब म्हणजे ही सर्व औषधे मुदतबाह्य असल्याची बाबही समोर आली आहे. शनिवारी सकाळपासून सुरु असलेली तपासणी रात्री उशीरापर्यंत सुरु होती. या दरम्यान रुग्णालयातील ऑपरेशन रजिस्टर, एमटीपी रजिस्टर यासह काही फाईल आणि रजिस्टर जप्त केले आहे.

पोलिसांनी तपासादरम्यान डॉ. रेखा कदम हिला सुरुवातीलाच अटक केली होती. रेखा कदम हिच्या पोलीस कोठडीतील तपासात झालेल्या बयाणावरुन १२ जानेवारी रोजी रुग्णालय परिसरातील बायोगॅस चेंबरमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे गर्भपाताचे भ्रुण शोधण्यासाठी पोलिसांनी तपासणी केली. मात्र, याच दरम्यान पोलिसांना त्याच चेंबरमध्ये १२ कवट्या अन् ५४ हाडं आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी डॉ. रेखा कदम यांना सहकार्य करणाऱ्या दोन परिचारिकांनाही अटक केली आहे. शनिवारी मध्यरात्री  १ वाजून ४५ मिनिटांनी या प्रकरणात डॉक्टर नीरज कदमला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

संबंधित बातमी :

अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण : आर्वीच्या डॉ. कदम हॉस्पीटलच्या झडतीत मिळाली काळविटाची कातडी

शनिवारी सकाळपासूनच कदम रुग्णालय परिसरात डॉ. नीरज कदम यांना सोबत घेत आर्वी पोलिसांसह आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी केली. याच दरम्यान पोलिसांना कदम यांच्या घरात काळविटीची कातडी आढळली तर आरोग्य विभागाच्या पथकला काही औषधी आणि इंजेक्शन सुद्धा मिळाले असून ते आरोग्य विभागाने जप्त केले आहे.

हे देखील वाचा : 

अखेर अमरावती मनपा, पोलीस प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला

फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर देशाचे नावलौकिक होईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

धक्कादायक! सिलिंडरच्या स्फोटात बाप-लेकाचा जागीच मृत्यू…

 

 

 

 

Comments are closed.