Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 61 कोरोनामुक्त 107 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन बाधितांचा मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • आतापर्यंत 15,483 बाधित झाले बरे
  • उपचार घेत असलेले बाधित 2,191

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

चंद्रपूर, दि. 18 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 107 नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली असून 61 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
आज मृत झालेल्या बाधितामध्ये रेल्वे कॉलनी चंद्रपूर येथील 80 वर्षीय पुरूष व भारळा ता. वरोरा येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 277 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 257, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 11, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 107 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 17 हजार 951 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 61 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 15 हजार 483 झाली आहे. सध्या 2 हजार 191 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 32 हजार 111 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 12 हजार 570 नमुने निगेटीव्ह आले आहे.नागरिकांनी मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.