Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धोडराज ठिय्या आंदोलनाला सुरजागड इलाख्याचे समर्थन , आदिवासींचे दमन खनिज संपत्ती लुटण्यासाठी : सैनू गोटा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : २५ फेब्रुवारी, अनुसूचित क्षेत्रातील खनिज संपत्तींवर देशातील बड्या भांडवलदारांची वाईट नजर पडलेली असून जल, जंगल, जमीन आणि संसाधनाच्या मालकी हक्कांपासून  हुसकावून लावण्यासाठी आदिवासींवर पोलिस बळाच्या जोरावर दमन करण्यात येत असल्याची टीका सुरजागड पारंपारिक इलाखा गोटूल समीतीचे प्रमुख,जि.प.सदस्य सैनू गोटा यांनी केली.

भामरागड इलाख्यातील नेलगुंडा परिसरातील आदिवासी महिलांच्या मोठ्या सहभागाने धोडराज पोलिस मदत केंद्रासमोर रस्त्यावरच मांडलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरजागड पारंपारिक इलाखा गोटूल समीतीच्या वतीने आज जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह समर्थन जाहीर केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी ते पुढे म्हणाले की, आज बस्तरसह गडचिरोली जिल्हाही या दुष्टचक्रात सापडलेला असून आमच्या हजारो पिढ्यांनी जपलेली साधनसंपत्ती सरकारच भांडवलदारांच्या घशात घालायाला निघाले आहे. याविरोधात आवाज उठविणाऱ्या आदिवासी लोकांना नक्षलवादी ठरवून ठार मारण्याचा आणि जेलात टाकण्याचा सपाटा सुरू करुन संविधानिक हक्कांची पायमल्ली केली आहे. त्यामुळे हक्क आणि अधिकारांसाठी निरंतर संघर्ष सुरू ठेवण्याचे   आवाहनही सैनू गोटा यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य ॲड.लालसू नोगोटी, पंचायत समिती सभापती गोई कोडापे,सुकराम मडावी, पं.स.सदस्य प्रेमीला कुड्यामी, कोठीच्या सरपंच भाग्यश्री लेखामी, मंगेश नरोटे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.