Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पत्नीच्या विरहात सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

गडचिरोली दि.10मार्च: धानोरा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 113 व्या तुकडीत तैनात असलेल्या जवानाने स्वतःच्या  रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास समोर आली आहे.

चंद्रभूषण ध्यानचंद जगत वय 28रा.कुकुदीरकेरा जिल्हा बिलासपुर छत्तीसगड असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चंद्रभूषण हा  केंद्रीय राखीव पोलीस दलात २०१७ साली भरती झाला होता .याआधी तो छत्तीसगढ मध्ये सेवा देत होता .पाच महिन्यापूर्वी त्याची  धानोरा येथे बदली झाली होती. सिआरपिएफ 113 बटालियन ई कैम्प येथे तो  कार्यरत होता. आज सकाळी तो कॅम्प मध्येच ड्युटीवर असताना स्वतःच्या रायफल ने गळयावर गोळी झाडून आत्महत्या केली.

आज सकाळी त्याला त्याला त्याच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी कळताच,पत्नीच्या विरहात त्यानेही रायफलने गोळी मारून आपली जीवनयात्रा संपविली .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर घटनेचा मौका पंचनामा करुण अधिक तपास धानोरा पोलिस करीत असून जवानाचा मृतदेह शवविच्छेदन गडचिरोली येथे करून जवानाचा मृतदेह त्याच्या मुळगावी पाठविण्यात येणार आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.