Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पन्नास लाख रुपयाची खंडणीसाठी शिक्षकासह मुलाचे अपहरण करणाऱ्या पाच जणांना अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सांगली, दि. १९ मार्च : जिल्ह्यातील आष्टा येथील शिक्षक शिवाजी यशवंत ढोले आणि त्यांचा मुलगा पियुष या दोघांचे  अपहरण करून त्यांना मारहाण कारण्यात आल होती. त्यांची लूटमार करून पन्‍नास लाख रुपयाची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी पाच आरोपीना अटक केली. या प्रकरणी आणखी काही सराईत गुन्हेगार अपहरण प्रकरणात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित शिवाजी ढोले हे काकाचीवाडी येथील सेवा सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आष्ट्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. ढोले आणि पियुष हे दोघे एका ढाब्यावर जेवले. त्यानंतर ते आष्टामार्गे सांगलीकडे येत होते. रात्री १० च्या सुमारास कसबे डिग्रज हद्दीत एक पांढर्‍या रंगाची कार त्यांच्यासमोर थांबली. नंबर प्लेटला गुलाल लावलेला होता. त्याचवेळी आणखी एक कार तिथे येऊन थांबली. दोन्ही गाड्यांमधून चेहर्‍याला रुमाल बांधलेले १० लोक उतरले. दोघांच्या अंगावर गुलाल टाकू लागले. ढोले यांनी त्यांना “हा कसला गुलाल आहे”,  असे विचारले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यावेळी त्यांना शिवीगाळ करीत “चल तुला कसला गुलाल आहे ते पुढे गेल्यावर सांगतो” असे म्हणत मारहाण करून कारमध्ये बसवले. दोन ते अडीच तास प्रवास केल्यानंतर एका निर्जनस्थळी दोघांना नेण्यात आले. तेथे त्यांनी डोळ्यांचे रुमाल सोडले. तिथे दोन खोल्या दिसत होत्या. चार – पाच संशयित दोघांना खोलीत घेऊन गेले. त्यांच्या हातात सुरा, चाकू आणि चॉपर अशी हत्यारे होती. त्यानंतर त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. “जिवंत सोडायचे असेल तर आम्हाला ५० लाख रुपये द्यावे लागतील”, असे म्हणाले. ढोले यांनी जवळचे २० हजार दिले आणि, ५० लाख देण्याचे कबूल केले. त्यांनतर त्यांना सोडुन देण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या प्रकरणी शिक्षक शिवाजी ढोले यांच्या तक्रारीवरुन दहा संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला, असून त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली.

हे देखील वाचा : 

भीषण अपघात! दोन दुचाकीची समोरासमोर धडक; ४ गंभीर तर एकाचा मृत्यु  

बेंगलोर येथील ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिबिरात गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला महाराष्ट्र व गोवा या दोन राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी

दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी करणार प्रयत्न – माजी आ. दिपकदादा आत्राम

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.