Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात! दोन दुचाकीची समोरासमोर धडक; ४ गंभीर तर एकाचा मृत्यु  

कोरची तालुक्यातील पकनाभट्टी जवळील घटना. 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

कोरची, दि. १७ मार्च :  कोरची-देवरी या राज्य महामार्गवर मुख्यालयापासुन २ कि.मी. अंतरावर असलेल्या पकनाभट्टी येथील मुख्य चौकात दोन दुचाकीची समोरासमोर जबर धडक बसल्याने यात ४ जण गंभीर जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२ च्या सुमारास घडली असून कोरची पोलीस स्टेशन मध्ये गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

देवरी येथून बेळगाव कडे जात असलेल्या दुचाकी क्रमांक MH – 25 – Z – 4367 या वाहनावर तिघे बसून जात असताना यांच्या विरोधी दिशेने येत असलेल्या दुचाकी क्रमांक CG – 04 – LR – 3295 या वाहनावर दोघे बसून असता या दोन दुचाकीची समोरासमोर जबर धडक बसल्यामुळे बसलेले पाचही दुचाकी स्वार हे रस्त्याच्या कडेला पड़ून गंभीररित्या जखमी झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर धडक इतकी जोरदार होती की, पाचही लोकांच्या पायाचे हाड मोडले होते.

प्राप्त माहितीनुसार या अपघातात जखमी झालेल्याची नावे पुरषोत्तम अलोने कोहळी टोला, अशोक नायक अंबोरा, तुळशीराम कवास, कांतालाल घुघवा दोडके, प्यारेलाल घुघवा दोडके असे आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अपघातात गंभीर झालेल्यापैकी कांतालाल घुघवा यांच्या ग्रामीण रुग्णालय कोरची येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.  उर्वरित ४ लोकांना प्राथमिक उपचार करून तातडीने गडचिरोली येथे रुग्णवाहिकेने हलविन्यात आले.

सदर रुग्णांना ग्रामीण रुग्णालय कोरची येथे नेले असता सदर रुग्णालयाचे कामकाज हे नेहमी प्रमाणे वाऱ्यावर दिसून आले. सदर रुग्ण हे बाहेर तडफडत असतांना सुद्धा त्यांना ताडडीने रुग्णालयात दाखल न करता रुग्णालयाचे कर्मचारी हे फक्त बघ्याची भूमिका करीत असल्याचे दिसून आले.

सध्यस्थितीत ग्रामीण रुग्णालय कोरची येथे ४ वैद्यकीय अधिकारी हे कार्यरत असून सुद्धा रुग्णालयात ३ वैद्यकीय अधिकारी हे नेहमी प्रमाणे गैरहजर दिसून आले. सध्या होळीचा सण असल्यामुळे या सणाच्या वेळी अपघाताचे प्रमाण हे जास्त होत असल्याचे बघितले जाते परंतु सदर रुग्णालय हे फक्त एका डॉक्टर च्या भरोश्यावर असल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

हे देखील वाचा : 

बेंगलोर येथील ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिबिरात गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला महाराष्ट्र व गोवा या दोन राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी

दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी करणार प्रयत्न – माजी आ. दिपकदादा आत्राम

 

 

Comments are closed.