Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी करणार प्रयत्न – माजी आ. दिपकदादा आत्राम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आलापल्ली, दि. १७ मार्च:  नगरपंचायतमध्ये घवघवीत यश संपादन झाल्याने नागरिकांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी  माजी आ. दीपक आत्राम एटापल्ली तालुक्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष भेटी देत आहेत. सध्या ग्रामीण भागात नागरिकांच्या समस्येकडे अपेक्षेप्रमाणे कोणीही लक्ष देत नसल्याने स्थानिक नागरिक माजी आ. दिपकदादा आत्राम यांना भेट देऊन समस्येचे निराकरण करण्याची विनंती करीत असल्याने माजी आ. आत्राम  यांनी नुकतेच एटापल्ली तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या झारेवाडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या समस्या सभेत जाणून घेतल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी सभेत नागरिकांनी विविध प्रश्न उपस्थित करून लक्ष वेधले. प्रामुख्याने मानवीय जीवनावश्यक बाबीकडे आजही दुर्लक्ष केल्या जात आहे.  रस्ते,पिण्याचे पाणी,आरोग्य व शिक्षणा संबधी समस्या जैसे थे आहे. त्या समस्या  निकाली काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मुद्दा उचलून धरला. त्यावेळी माजी आ. दिपकदादा आत्राम यांनी नागरिकांना मार्गदर्शन करून उपस्थित केलेल्या समस्येचे निराकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी नंदूभाऊ मट्टामी, आविस तालुकाध्यक्ष एटापल्ली, मंगेश हलामी माजी प.स. सदस्य एटापल्ली, मुन्नी धुर्वा, माजी सरपंच तथा ग्रा.प. सदस्य तोडसा, संगीता धुर्वा प. स. सदस्य एटापल्ली, सम्मा गोटा, पोलीस पाटील, रैनू नरोटे, ज्ञानेश गावडे, आविस तालुका सचिव तथा सदस्य ग्रा. प. तोडसा, भिवा मट्टामी उपसरपंच ग्रा.प. तोडसा, सुधाकर नरोटे, कन्ना नरोटे, किशोर तिम्मा, कोकण सरकार, लुला नरोटे, रामजी नरोटे, महारु गोटा एकरा, रानू गोटा एकरा, विजय कुसनाके, माजी सरपंच आलापल्ली, जुलेख शेख, संदीप बडगे यासह परिसरातील गावकरी व आविस चे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

बेंगलोर येथील ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिबिरात गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला महाराष्ट्र व गोवा या दोन राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी

20 लाख रू. ईनामी असलेल्या 02 जहाल नक्षलवाद्यांचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

 

Comments are closed.