Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यातील पहिली गोंडी भाषिक शाळा गडचिरोलीच्या मोहगाव येथे सुरू

ग्रामसभेमार्फत ठराव पारित करून गोंडी भाषा व संस्कृती जतन करण्यासोबत गोंडी भाषेतून आयाना कृषी शिक्षण देण्यावर भर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १९ मार्च  :  आज खेड्यापाड्यात जिल्हा परिषदच्या शाळा पोहोचल्या असून त्यांना मराठीतच शिक्षण देत आहे. गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल असल्याने मुलांना अडचण निर्माण होत होती.  शिवाय मुलांच्या आरोग्य जपण्यासाठी मोफत शिक्षणासोबतच शाळांमधून मुलांना मोफत पोषण आहारासोबत विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. मात्र याऊलट धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे ग्रामसभेने आदिवासी संस्कृती जतन करण्यासह आदिवासींच्या चालीरीती, परंपराची माहिती असावी म्हणून गोंडी भाषेतून शिक्षण देण्याचा मुलांना अनोखा प्रयत्न सुरू केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

धानोरा तालुक्यातील पंधरा गावांतील नागरिक एकत्र येत आदिवासी संस्कृती जपण्यासाठी मोहगाव या गावात गोंडी भाषेतील पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल मार्फत शाळा सुरु केली असून ही राज्यातील पहिलीच शाळा आहे. या शाळेच्या माध्यमातून ग्रामसभा अंतर्गत पंधरा गावातील लहान मुलांना आदिवासी संस्कृतीचे धडे दिले जात आहेत. या शाळेसाठी ग्रामसभेने चार उच्चशिक्षित शिक्षकांसह मुख्याध्यापकाची नियुक्ती केली असल्याने आहे. सध्या ही शाळा जिल्ह्यातील सर्व ग्रामसभांसाठी आदर्श ठरत आहे.

धानोरा तालुक्यातील महागाव ग्रामसभेला सामूहिक वनहक्काचा अधिकार असल्याने आजूबाजूच्या १५ गावातील आदिवासी बांधव एकत्र येत एकमुखाने ग्रामसभे अंतर्गत ठराव पारित करून मोहगाव येथे महाग्रामसभा स्थापन करण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचीतील तरतुदीनुसार ग्रामसभेला मान्यता देण्यात आल्याने ग्रामसभामार्फत स्थानिक लोकसहभागातून गोंडी भाषिक शाळा सुरू केली आहे. ही शाळा २१ फेब्रुवारी २०२१ रोजी जागतिक मातृभाषा दिनी सुरू करण्यात आली असून ४५ विद्यार्थ्यांनी शाळेत नोंदणी केली आहे. सध्या येथील विद्यार्थ्यांना बालवाडी ते इयत्ता पहिलीपर्यंतचे शिक्षण दिले जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आदिवासी संस्कृतीसोबतच शेती, निसर्गाचे रक्षण यासह विविध प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. याशिवाय आदिवासींच्या पूर्वजांच्या शौर्यगाथेचे धडेही या चिमुकल्यांना शिकवले जात आहेत. ग्रामसभेचे प्रतिनिधी दर महिन्याला पालक व शिक्षकांची बैठक आयोजित करतात. ज्यामध्ये शाळेच्या समस्या सोडवण्याबरोबरच मुलांसाठी धोरणात्मक-नवीन उपक्रम घेण्याचेही निर्णय घेतले जातात. या शाळेत पूर्णतः वास्तव्य करून येथे शिकणाऱ्या सर्व मुलांसाठी वसतिगृहाचीही सोय करण्यात आली आहे. सर्व पंधरा गावातील नागरिकांनी श्रमदान करून या शाळेचे बांधकाम केले आहे.

त्याच बरोबर पालक सुद्धा एक क्विंटल तांदूळ इतर प्रकारच्या साहित्यासह एक वर्षासाठी ग्रामसभेत मुलांच्या जेवणासाठी जमा करतात. या शाळेतील विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दररोज सकाळी ८ वाजता या शाळेची सुरुवात गोंडी भाषेतील गीतांनी होते. गोंडी भाषेच्या विषयासोबतच येथे मराठी आणि इंग्रजीचे धडेही दिले जातात. गोंडी भाषेच्या शिक्षणाला मान्यता मिळावी यासाठी ग्रामसभेच्या प्रतिनिधींमार्फत महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. शाळेत गोंडी भाषा शिकविण्यासाठी डी.एड., एम.ए. बीएड पदवीधर आपली जबाबदारी सांभाळत आहेत. आदिवासी पोशाख परिधान करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम शिक्षकांची  टीम दररोज करीत असून विशेष म्हणजे राज्यातील गोंडी भाषिक शाळा पहिलीच आहे.

हे देखील वाचा : 

पन्नास लाख रुपयाची खंडणीसाठी शिक्षकासह मुलाचे अपहरण करणाऱ्या पाच जणांना अटक

भीषण अपघात! दोन दुचाकीची समोरासमोर धडक; ४ गंभीर तर एकाचा मृत्यु  

दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी करणार प्रयत्न – माजी आ. दिपकदादा आत्राम

 

Comments are closed.