Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“माझा प्रभाग माझी जबाबदारी” नगरसेविका दिपाली मुकेश नामेवार यांचा अभिनव उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी’, दि. ३० मार्च : अहेरी शहरातील प्रभाग क्र. 6 शिवाजीनगर येतील नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती दिपाली मुकेश नामेवार यांचा अभिनव उपक्रम-माझा प्रभाग माझी जबाबदारी घेत प्रभागासाठी स्वखर्चाने फोगिंग यंत्र खरेदी केले असून फोगिंग यंत्राचे विधान परिषदेचे आमदार रामदासजी आंबटकर यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आले. फोगिंग यंत्राद्वारे प्रभागात दर पंधरा दिवसांनी फोगिंग करणार आहेत,अशी माहिती पाणी पुरवठा सभापती दिपाली मुकेश नामेवार यांनी दिली.

या यंत्राच्या साहाय्याने नियमित दर पंधरा दिवसांनी फोगिंग केल्याने प्रभागातील नागरिकांना मिळणार डासांपासून मुक्ती आणि डासांपासून होणाऱ्या जीव घेणाऱ्या मलेरिया, डेंग्यू सारख्या रोगांपासून सुरक्षित करण्याचा प्रयत्न आहेत. या अभिनव उपक्रमांमुळे प्रभागातील नागरिक आनंदित झाले असून सर्वत्र स्तुती केली जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पाणी पुरवठा सभापती दिपाली मुकेश नामेवार यांची आमदार रामदासजी आंबटकर यांनी स्तुती करत भाजपा नगरसेवकांनी आपल्या प्रभागाची जबाबदारी पार पाडली पाहिजे,लोककल्याणकारी योजना गरजूंना मिळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे,मतदारांच्या सुख दुःखात सहभागी झाले पाहिजे,माझा प्रभाग माझे कुटुंब समजून जोपासना करावी अशी मार्गदर्शन या शुभारंभ दरम्यान दिली.

या कार्यक्रमात जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,जिल्हा संघटन मंत्री रवींद्रओल्लालवार,अनिलजी पोहणेकर,आ आ कार्यकारी अध्यक्ष संदीप कोरेत,भाजप तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, जेष्ठ नेते रमेश समुद्रालवार,तालुका महामंत्री मुकेश नामेवार,सक्रिय कार्यकर्ते प्रशांत ढोंगे, श्रीकांत नामनवार,नागराज रापर्तीवार,आदित्य रामगोनवार,रोहित पाले तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

रखडलेला चेन्ना सिंचन प्रकल्प मार्गी लावा; राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी

तृतीय पंथी ओळख दिनानिमीत्त मतदार नोंदणीची विशेष शिबिरे

राज्यपालांनी गोंडवाना विद्यापीठाचा स्टार्टअप संबंधी घेतला आढावा…

 

Comments are closed.