Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आयपीएल सट्टा चालविणाऱ्या टोळीचे पितळ झाले उघडे; 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वर्धा, दि. ५ मे: वर्ध्यात आयपीएल (IPL) क्रिकेट मॅच वर सुरू असलेल्या सट्टावर धाड टाकत होमेश्वर वसंतराव ठमेकर यांच्या सावंगी मेघे येथील फॉर्म हाऊसवर कायदेशीररीत्या प्रवेश करून आयपीएल ऑनलाईन क्रिकेट सट्टा-जुगारवर छापा टाकण्यात आला.

यामध्ये सहा आरोपीना अटक केली असून होमेश्वर वसंतराव ठमेकर, प्रवेश चिनेवार,अशोक ढोबळे, गिरीश क्षिरसागर, दिनेश प्रताप नागदेव, अविन गेडाम, अशी अटक केलेल्या आरोपीचे नावे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे सुरू असलेल्या पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन या संघाच्या आयपीएल २०-२०  ओव्हरचे मॅचवर सट्टा सुरू होता. यावर कारवाई केली असून 3 टीव्ही संच,10 अँड्रॉइड मोबाईल संच, 36 साधे किपॅड मोबाईल, 3 रेकॉर्डर संच,1 वायफाय डोंगल, 2 लॅपटॉप, 1 इन्वर्टर, एक बॅटरी व एक हिशोबाची डायरी, महागड्या कंपनीचे चारचाकी वाहन, 3 दुचाकी वाहने व इतर साहित्य असा एकुण 26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर प्रकरणाचा तपास सुरु असून इतर जिल्ह्याचे बुकीशी तार जूळले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.