Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे अहेरीत वटपौर्णिमा साजरी

वटवृक्षाचे पूजन करून महिलांनी सात फेऱ्या मारले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. १४ जून :  हिंदू धर्मात वटपौर्णिमाला अनन्य साधारण महत्व असून हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पोर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे आज मंगळवार 14 जून रोजी अहेरी येथे वडाचे झाडाचे पूजन करून व झाडाच्या सभोवताल धागा बांधून महिलांनी फेऱ्या मारले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा सचिव प्रियंका आलाम, प्राजक्ता बिडवाई, संप्रदा पाठक आदी महिलांनी वटवृक्षाचे पूजन करून वटपौर्णिमाचे सण साजरा केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे आणि सप्तपदिंच्या सात फेऱ्यांनी बांधलेले हे प्रेमाचे बंधन, जन्मोजन्मी राहो असेच कायम, कोणाचीच लागो ना त्याला नजर या संसाराला, दरवर्षी अशीच येवो ही वटपौर्णिमेची घडी कायम अशी मनोकामना करीत वटपौर्णिमाचा सण साजरा करण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.