Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जव्हार मधील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळला…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर, दि. १७ जून : पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यातील वडपाडा गावातील बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला. सदर मुलगी ही आदिवासी समाजाची असून तिने यंदा दहावीची परीक्षा दिली होती. मंगळवारपासून ही १६ वर्षीय अचानक बेपत्ता झाली होती, या प्रकरणी तिच्या पालकांनी जव्हार पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु या मुलीचा बुधवारी सायंकाळी संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. शहरी भागात हे प्रमाण जास्त असेल तरी, आता ग्रामीण भागात देखील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. जव्हार तालुक्यातील वडपाडा येथील अल्पवयीन मुलीगी मंगळवारी बेपत्ता झाली होती, तिचा शोध सुरु असताना गावापासून काही अंतरावर तिचा मृतदेह सापडला. सदर मृतदेहाच्या अंगावर आणि डोक्यावर जखमा असल्याचे दिसून आले आहे. तसेच तिच्यावर बलात्कारही झाल्याचाही संशय व्यक्त केला होत आहे. त्यामुळे यामुळे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून आता शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण काय आहे, तसेच इतर गोष्टींचा खुलासा होणार आहे. या प्रकरणी जव्हार पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.