Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ. अनिल हिरेखण गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि २२ जुलै : गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून डॉ. अनिल हिरेखण यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. हिरेखण हे सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. रामटेकच्या कवी कुलगुरु  इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथे डॉ. हिरेखण हे १९९९ ते २००३ या काळात प्राध्यापक होते. २०१७ मध्ये ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात परीक्षा नियंत्रक झाले. जून २०२१ पासून ते आजतागायत नागपूर विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे गोंडवाना विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव मिळाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.