Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आता आयुर्वेदिक डॉक्टर सर्जरी करू शकणार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

आयुर्वेदिक डॉक्टरांनाही सर्जरी करण्यासाठी मोदी सरकारने परवानगी दिली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क :- डॉक्टरांसंदर्भात मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. दरम्यान आता आयुर्वेदिक डॉक्टरांनाही सर्जरी करण्यासाठी मोदी सरकारने परवानगी दिली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी केल्या आहेत. यानुसार आयुर्वेदातील पीजी विद्यार्थी सर्जरी करू शकतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

केंद्र सरकारने १९ नोव्हेंबरला यासंदर्भात अधिसूचना जारी केली. या अधिसूचनानुसार आयुर्वेदाच्या पीजी अभ्यात सर्जरीचा अभ्यासक्रमही जोडण्यात येणार आहे. तसेच आयुर्वेदीक डॉक्टर हाडांचे आजार, डोळ्यांचे आजार, नाक,कान,घसा आणि दातांशी संबंधित सर्जरी करू शकणार आहेत. यासंबंधित कायद्याचे नाव बदलण्यात आले असून भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदसंशोधन विनियम,२०२० असे ठेवण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बऱ्याच काळापासून आयुर्वेदात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांच्या वतीने अॅलोपथीप्रमाणे अधिकार देण्याची मागणी करण्यात येत होती. आता नव्या अधिसूचनेनुसार, आयुर्वेदातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सर्जरी करण्याची प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गेल्या २४ वर्षांपासून आयुर्वेदाच्या संस्थांनांमध्ये सर्जरी गेल्या जात आहेत. या अधिसूचनेत फक्त हे स्पष्ट करण्यात आले की, या सर्जरी वैध असणार आहेत, असे सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या अध्यक्षांनी सांगितले.

एकाबाजूला केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आयुर्वेदातील डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला इंडियन मेडिकल असोसिएनचे याबाबत मत वेगळे आहे. या निर्णयामुळे डॉक्टरांमध्ये खिचडीसारखी परिस्थिती निर्माण होईल. तसेच देशातील संमिश्र परिस्थितीमुळे हायब्रिड डॉक्टरांना प्रोत्साहन मिळेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.