Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

लंडन 09 सप्टेंबर :-  ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचे वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन यांचे निधन झाले आहे. बकिंघम पॅलेसकडून महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे.

महाराणी एलिझाबेथ या गेल्या काही काळापासून अत्यवस्थ होत्या. वृद्धापकाळामुळे त्यांना चालता-फिरता येत नव्हते. त्यामुळे त्यांना ब्रिटनच्या बंकिंघम पॅलेसऐवजी स्कॉटलंड येथील बाल्मोरस पॅलेस येथे ठेवण्यात आले होते. बाल्मोरस पॅलेस येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एलिझाबेथ यांचा विवाह प्रिन्स फिलीप यांच्यासोबत 1947 मध्ये झाला. मागील वर्षी, 9 एप्रिल 2021 मध्ये वयाच्या 99 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. एलिझाबेथ यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. मात्र, त्यांना वयोमानाप्रमाणे इतर आजारांचा सामना करावा लागत होता.

हे देखील वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

…पुन्हा नरभक्षक वाघाने घेतला एकाचा बळी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.