Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हिंदी भाषिक भवनावरुन युवा साहित्यिक सर्वेश तरेंचा मुख्यंमंत्री उध्दव ठाकरेंना थेट ‘आगरी पत्र’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क :- मीरा-भाईंदर महानगरपालिकेने ‘हिंदी भाषिक भवन’ प्रस्तावाला मंजुरी दिल्याने युवा साहित्यिक सर्वेश तरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना थेट ‘आगरी’ बोलीत पत्र लिहीले आहे.
मीरा-भाईंदर येथे स्थानिक भुमीपुत्र असलेले आगरी कोळी बांधव २००७ पासुन ‘आगरी भवनाची’ मागणी करत असताना अजुन वास्तु उदयास आली नाही किंबहूना आगरी भवनासाठी भुमीपुत्रांच्या स्थानिक संस्थेला वादग्रस्त जागा सोबत ‘सांस्कृतिक भवन’ भाडेतत्वावर देणार असुन ‘हिंदी भाषा भवनास’ क्लीअर प्लाॅट तर सरकार कडुन १ कोटी आणि शिवसेना खासदार-आमदार निधीतून ७५ लाख रुपयाची निधी मंजुर केली आहे. याच आशयावर ‘आगरी-कोळी इथली मुळ भाषा असताना आजवर तिच्या जतना-संवर्धनासाठी एकही रुपया न संपवता ‘हिंदी भाषिकांसाठी’ होणारा भवन हा भुमीपुत्रांचा अपमान आहे असे सर्वेश तरे यांनी पत्रात उध्दव ठाकरे यांना म्हटले आहे.

सोबतच तरे स्वत: आणि स्थानिक भुमीपुत्रांच्या संस्था २०१२ पासुन आगरी भवनासाठी ठाणे महानगर पालिकामध्ये मागणी करत असुन २०१९ ला आगरी-कोळी भवनाचे ‘अदित्य ठाकरेंच्या’ हस्ते फक्त भुमीपुजन झाले आणि अजुनही वास्तु हयातीस आली नाही असे पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्रात एकही ‘मराठी भवन’ नाही आणि अनेक मराठी भाषेसाठी काम करणारी मंडळ हे आपले कार्यालय ‘भाडेतत्वावर’ चालवीत असताना मात्र हिंदी भाषिक भवनासाठी सरकार आग्रहाने पुढाकार घेत असल्याची खंत आहे. पत्रात तरे यांनी भुमीपुत्रांवर कशाप्रकारे भुमीपुत्रांना गृहीत धरुन त्यांचे ‘रेती,शेती,मासेमारी,विटभट्टी’ पारंपारिक व्यवसाय नष्ट केले आणि आता स्थानिकांच्या जागेवर असणाऱ्या आरक्षित भुखंडावर परप्रांतियासाठी होणाऱ्या सुविधांवर भुमीपुत्र गप बसणार नाही. हिंदी भाषिक भवन जर सरकारने रद्द केले नाही तर स्थानिक भुमीपुत्र रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील असाही इशारा तरेंनी दिला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सर्वेश तरें सोबत मराठी एकीकरण समितीने देखील विरोध दर्शवला आहे. त्यांनी देखील सरकारला ‘हिंदी भाषिक भवन’ झाले तर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.दरम्यान सर्वेश तरे यांचे ‘दादुस,या असा कला’ हे आगरी भाषेतील हे पत्र समाज माध्यमांत वायरल झाले असुन सर्व स्थरातुन त्यांना पाठिंबा मिळत आहे.

Comments are closed.