Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्रातील शिवनाथ नदी ठरली छत्तीसगड राज्याची जीवनदायी

 शिवनाथ नदीच्या उगमस्थानी महाआरतीचे आयोजन, छत्तीसगड राज्याच्या स्तुत्य उपक्रमाला आमदार तथा संसदीय सचिव इंदल साहेब मडावी यांची उपस्थिती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

कोरची, दि. २३ सप्टेंबर : झाडाला फळे लागतात पण झाड कधी फळ खात नाही, ती फळ इतरांच्या उपयोगी पडत असतात असेच काही कोरची तालुक्यातील गोडरी गावातून उगम झालेली शिवनाथ नदी छत्तीसगड राज्याची जीवनदायी नदी ठरली आहे. 

कोरची तालुक्यातील लोकांना उपयोगाची नसली तरी आम्हाला ती जीवनदायी आहे असे उद्गार आमदार तथा संसदीय सचिव इंदल साहेब मडावी यांनी महाआरती कार्यक्रमात काढले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

धान का कटोरा म्हणून प्रख्यात असलेल्या छत्तीसगड राज्याला सिंचनापासून पिण्याच्या पाण्याची सोय करून देणारी छत्तीसगड राज्याची जीवनदायी असलेल्या शिवनाथ नदीचा उगम स्थान असलेल्या कोरची तालुक्यातील गोडरी येथे छत्तीसगड प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले आमदार तथा संसदीय सचिव इंदल साहेब मडावी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली .

छत्तीसगड राज्यातील चौकी राजनांदगाव , रायपूर , भिलाई पासून सर्व गावांना सिंचनाच्या सोयीपासून पिण्याच्या पाण्याची सोय करणारी शिवनाथ नदी छत्तीसगड राज्यातील जनतेला जीवनदायी ठरली आहे.या नदी मुळे आपले जीवन सर्व गोष्टींनी परिपक्व झाले आहे अशी धारणा ठेवून छत्तीसगड शासनाने उगमस्थान असलेल्या गोडरी गावात येऊन प्रशासकीय महाआरतीचे २४ सप्टेंबरला आयोजन करण्यात आले होते . या महाआरतीचे शासकीय प्रतिनिधी म्हणून आमदार तथा संसदीय सचिव इंदल साहेब मडावी यांना प्रशासनाने जबाबदारी दिली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 यावेळी छत्तीसगड राज्यातील बहुसंख्य नागरिक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती नाना नाकाडे होते गडचिरोलीचे माजी आमदार नामदेवराव उसेंडी,हे प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.

न्यु एकता आदिवासी क्रीडा मंडळ , देळभटटी पाटीलटोला यांच्या सौजन्याने आयोजित एक दिवसीय डे – नाईट भव्य प्रो कबड्डी स्पर्धेची औपचारिकता साधून शिवनाथ नदी उगमस्थान दर्शन महाआरती आयोजन करण्यात आले होते.

यावेळी देऊळभटी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौ गिरजा कोरेटी , कोरची पंचायत समिती सभापती श्रावण मातलाम, राजेश नैताम, परमेश्वर लोहंबरे, झुल्फिकार खेतानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सियाराम हलामी, अविनाश हूमने,चेतन कराडे, स्वप्निल कराडे,आदि मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जैन यांनी केले तर आभार मनोज अग्रवाल यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईश्वर कोरेटी, प्रेमलाल उसेंडी, उत्तम कोरेटी, धनपाल टाटपलान,भुवन मुलेटी , पंकज बघवा,दयाराम पंधरे,हिरा आडुलवार, अर्जून कोरेटी , पन्नालाल फुलारे यांनी विनोद कोरेटी यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेतले.

गोडरी गाव हे अतिसंवेदनशील असल्याने गडचिरोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हे देखील वाचा : 

वेदांता, बल्क ड्रग पार्कनंतर मेडिसिन डिव्हाईस पार्क प्रकल्प महाराष्ट्रातून गेला – आदित्य ठाकरे

https://loksparsh.com/national/arifa-mulla-became-glamours-mrs-india/30412/

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.