Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक महिला डॉक्टरची गळफास घेवून आत्महत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर 5 ऑक्टोबर :- पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघरच्या सुख शांतीनगर परिसरात एका २८ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तृप्ती कौस्तुभ घरत (वय २८) असं या महिला डॉक्टरचं नाव आहे.

तृप्ती यांचा मृतदेह मंगळवारी (४ ऑक्टोबर) रात्री त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. २८ वर्षीय तृप्ती या बीएएमएस एम.डी डॉक्टर होत्या. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तृप्ती यांचा मृतदेह ताब्यात घेतला. तृप्ती यांच्याजवळ एक सुसाईट नोटही सापडली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.